औरंगाबा: स्मार्ट सिटी बस योजनेच्या अंतर्गत शहरात सध्या 40 बसेस 632 फेर्या करत आहेत. वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षा घेत आणखी 9 बस दाखल झाल्याने बसची संख्या आता 49 वर पोहोचली आहे. प्रवाशांची मागणी व गर्दी लक्षात घेऊन नवीन नऊ बस सोडण्याचे नियोजन लवकरच केले जाणार असल्याचे समजते.
मनपा व एसटी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट मिनी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पहाटे 3.45 ते रात्री 11.45 पर्यंत शहरात विविध प्रमुख मार्गांवर बस धावतात. खासगी ऑटोरिक्षाच्या भाड्यापेक्षा सिटी बसचे भाडेदर निम्म्याने कमी असल्याने प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळतो. त्यात बसमध्ये सेवासुविधा भरपूर आहेत. त्यामुळे शहरवासीयांनी बससेवेला चांगला प्रतिसाद दिला आहे.
शहरातील कानाकोपर्यात सिटी बसची मागणी होत आहे. मात्र, बसची संख्या तोकडी आहे. मुख्य मार्गांवर बस सोडल्या जातात. सातारा-देवळाई, कांचनवाडी, विद्यापीठ, शासकीय रुग्णालय, शैक्षणिक संस्था, एमआयडीसीत धावणार्या बसची संख्या अत्यल्प आहे. अशा ठिकाणी बस सोडण्याचे नियोजन करावे लागणार आहे.